Home धर्म-समाज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिनकर पाटील यांचे...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व राष्ट्रवादीचे पदाधिकारी दिनकर पाटील यांचे निधन

0
35

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील  डोणगाव येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे  जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव सिताराम पाटील (वय ७६) यांचे आज. मंगळवार दि.१६ रोजी हदयविकाराने निधन झाले.       

दिनकर सिताराम पाटील (दिनु नाना ) यांनी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती , फैजपूर मसाकाचे संचालक , महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक , यावल संजय गांधी समन्वय समितीचे विद्यमान सदस्य, डोणगाव वि.का.सो.चे चेअरमन आदि पदे त्यांनी सांभाळली होती. माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी व माजी गृहराज्यमंत्री जे.टी.महाजन यांचे अत्यंत विश्वासु व निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.                                     

त्यांची अंत्ययात्रा आज दि.१७ बुधवार रोजी त्यांच्या डोणगाव येथील राहत्या घरा पासून सकाळी एक वाजता निघणार आहे.त्यांचे पश्चात पत्नी,३ मुले ,सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी निलेश पाटील , उन्मेष पाटील, व यतीन पाटील यांचे वडील होत.


Protected Content

Play sound