जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कृषक भवन येथील दीपस्तंभ रीडिंग वाचणाऱ्या जवळून एकाची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत गुरुवार २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, सुकराम सदाशिव कोळी (वय-४९) रा. त्रिभुवन कॉलनी, कानळदार रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या त्यांचे काम जळगाव शहरातील कृषी भवन येथील दिपस्तंभ रीडिंग वाचनालयासमोर काम सुरू आहे. त्यावेळी ते दुचाकी (एमएच १९ बीएस ३१६८) ने आले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांनी दुचाकी पार्किंगला लावली. दरम्यान अज्ञात पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. काम आटोपल्यानंतर दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, दुचाकीची कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार २ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.