जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर चोरटी गावठी दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. दोघावर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुसुंबा गावाच्या बाहेर मोबाईल टॉवरजवळील नाल्याच्या बाजूला कृष्णा रघुनाथ भालेराव (वय-२०) आणि सुनिल भास्कर कोळी (वय-४१) दोन्ही रा. कुसुंबा ता.जि. जळगाव हे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली, त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, पोहेकॉ सिध्दश्वर डापकर, गफ्फार तडवी, सतिष गर्जे, होमगार्ड बाळू धिवरे यांनी कासरवाई करत आज बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कुसुंबा गावात छापा टाकून दोन कृष्णा भालेराव आणि सुनिल कोळी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातील दीड हजार रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहेकॉ सिध्देश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.