जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराच्या काचा फोडल्याच्या कारणावरून एकाला काठीने डोक्यावर व पायावर मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे अनिल गोरख सैदाणे (वय-४२) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अनिल सैदाणे हे घरी असतांना घराचे काचा फोडल्याच्या कारणावरून देवेंद्र शामराव काळे याला जाब विचारला. याचा राग आल्याने देवेंद्र काळे याने हातात काठी घेवून अनिल सैदाणे याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जखमी अवस्थेत अनिल सैदाणे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी २६ एप्रिल रोजी संशयित आरोपी देवेंद्र काळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.