जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील लेखाधिकारी दर्जाचे अधिकारी एस.आर. गोहिल यांनी आज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्वतः खुलासा केलाय की, लेखाधिकारी पदाचा पदभार संध्याकाळी आमच्याकडून बळजबरीने काढण्यात आला आहे. यावरून त्या पदावरील नियुक्त्या बेकायदेशीर झाल्याचे दिसतेय. जर असे झाले असेल तर, त्या नियुक्त्या कोणाच्या आदेशाने करण्यात आल्या? तसेच या नियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात व कुलगुरुंनी याप्रकरणी आत्मपरीक्षण करून पदाचा दुरुपयोग केल्यामुळे राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. कुणाल पवार यांनी केली आहे. दरम्यान, पवार यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे.
महिती व जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील यांनी चुकीचा व खोटा खुलासा सादर केला होता. त्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने विद्यापीठ प्रशासनास खुल्या चर्चेला कागदपत्र घेवून या, असे आव्हान केले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने कुणाल बी पवार माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,भुषण संजय भदाने (अध्यक्ष फार्मसी स्टूडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्य यांनी २७ जानेवारी रोजी कुलगुरू महोदय यांच्याकडे मागणी केली होती की, लेखाधिकारी यांची नियुक्ती विद्यापीठाने रद्द करावी. त्यावर विद्यापीठाने खुलासा केला होता की, जळगाव विद्यापीठातील सर्व नियुक्त्या कायदेशीर आहेत. परंतू राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठ प्रशासनाने खुल्या चर्चेसाठी मैदानात यावे, असे आव्हान दिले होते. त्यावर विद्यापीठाने त्यांना खुलासा दिला नाही. परंतू आज वृत्तपत्रामध्ये विद्यापीठातील लेखाधिकारी दर्जाचे अधिकारी एस.आर. गोहिल यांनी स्वतः खुलासा केला की, लेखाधिकारी पदाचा पदभार संध्याकाळी आमच्याकडून बळजबरीने काढण्यात आला. त्यामुळे विद्यापीठात जर अशा नियुक्त्या झाल्या असतील, तर त्या कोणाच्या आदेशाने केल्या? व त्या नियुक्त्या तत्काळ रद्द कराव्यात व कुलगुरू महोदय यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करून व पदाचा दुरुपयोग केल्यामुळे राजीनामा द्यावा. असे गंभीर प्रकार कोणच्या सांगण्याचा वरून किंवा दबावाखाली झाले आहेत? त्यांची नावे कुलगुरूंनी जाहीर करावीत. तसेच सुनिल पाटील यांनी जर खुलासा त्यांच्या पातळी वरून केला असेल, तर खोटी महिती देवून सर्व दैनिक,विद्यार्थी,विद्यार्थी संघटना तसेच प्रशासन या सर्वांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर खोटी महिती दिली म्हणून कायदेशीर करवाई करावी व त्यांची विभागीय चौकशी करावी.
आजतागायत ज्या काही चुकीच्या माहितीच्या आधारे नियुक्त्या झाल्या आहेत. त्या रद्द कराव्यात. सदर खुलासा आल्याने माजी कुलसचिव यांच्या प्रकरणात देखील तसे काही झाले असल्याचे वाटत आहे. तसे न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केल्या शिवाय थांबणार नाही, असेही म्हटले अँड.पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, पवार यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली असून संबंधित विभागाकडे तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे.