मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा येथील पेट्रोलपंपावर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांची झोपेतच गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कुऱ्हा येथील पेट्रोल पंपावर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील आज मध्यरात्री अज्ञात व्यक्तींने गळा चिरून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील वढोदा, निमखेडी तसेच परिसरात खूनाच्या घटनेने भितीचे वातावरण विविध तर्कवितर्क होत आहे. कुऱ्हा गावचे पोलीस पाटील विजय पाटील यांनी पोलीसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान हत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनस्थळी पोलीस उपनिरीक्षक निलेश साळुंखे यांनी श्वान पथक मागविण्यात आले आहे.