कुऱ्हेपानाचे येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्ध जागीच ठार; डंपर चालकास अटक

Accident

भुसावळ प्रतिनिधी । शेतात कामाला जात असतांना 65 वर्षीय वृद्धाला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्द जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. घटना पाहून डंपर चालक घटनास्थळाहून याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरसह चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रल्हाद तुळशिराम पाटील (65, कुर्‍हेपानाचे) व त्यांचा मुलगा किशोर हे सोमवारी सकाळी शेताकडे पायी निघाले असताना कुर्‍हेपानाचे गावाजवळील कुर्‍हे-बोदवड रस्त्यावरील मारोती मंदिरापुढे कुर्‍हे गावाकडे येणारा भरधाव डंपर (एम.एच.19 झेड.4427) ने धडक दिल्याने प्रल्हाद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून पसार झाला. ग्रामस्थांनी यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अपघात प्रकरणी किरण प्रल्हाद पाटील (कुर्‍हेपानाचे) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी डंपर चालक मयूर गंगाधर फालक (साकेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीसह डंपर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.

Protected Content