भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुर्हा येथील एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत वृत्त असे की आखजीच्या पार्श्वभूमिवर, परिसरात पत्त्याचे डाव रंगल्याचे दिसून येत आहे. यातील स्पर्धेतूनच एकावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना येथे घडली. शरद पाटील यांच्यावर एका तरूणाने धारदार शस्त्राने वार करून पळ काढला. यातील आरोपीचा शोध घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हा हल्ला नेमका कसा व कोणत्या कारणासाठी झाला याची माहिती समोर आली नसली तरी उधारीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. करण अर्जुन बाविस्कर उर्फ अमोल याने हा हल्ला केला असून पोलिसांनी त्याच्याविरूध्द तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००