किराणा दुकान फोडून रोकड लांबविली

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पारोळा तालुक्यातील शिरसोदे गावातील किराणा दुकान फोडून ४० हजार रुपये किमतीची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

पारोळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की हरिश्चंद्र पुंडलिक मुसळे वय 42 राहणार शिरसोदे तालुका पारोळा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हे बंद दुकान फोडून दुकानातील ४० हजार रुपये रोकड चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर हरिश्चंद्र मुसळे यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Protected Content