किराणा दुकान फोडणारा सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकातील किरणा दुकानातून ९० हजारांची चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

 

संशयित जुबेर शेख भिकन उर्फ डबल रा. गेंदालाल मिल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात आनंद मदनलाल नागला यांचे किराणा दुकान आहे. सोमवार १ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातून ९० हजारांची रोकड लांबविली होती. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. तर सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार जुबेर उर्फ डबल हा फरार होता. सोमवारी १५ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा संशयित आरोपी जुबेरला शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व भास्कर ठाकरे यांनी गेंदालाल मिल परिसरातून मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content