यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथे ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभाराने सर्वत्र घाणीचे साम्रराज्य नागरीकांच्या आरोग्य धोका निर्माण झाला असुन ,गावात साथी हिवतापाच्या रुग्णामध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत असल्याने ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायती मधील विविध प्रभागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासुन सर्वत्र घाणीचे साम्रराज्य पसरले असुन, कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या गोंधळात ऐकीकडे गावात किनगाव गावात कोरोना बाधीत रूग्ण संख्या वाढत असतांना गावात र्निजंतुकीरण फवारणी करण्यात येत नसुन, दुसरीकडे साथीचे व हिवतापाचे ही रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याने ग्रामपंचायतील ग्रामस्थांच्या आरोग्याची अत्यंत काळजी घेणे हे क्रम प्राप्त असतांना गावात असे होतांना दिसत नसल्याने किनगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या अशा दुर्लक्षित आणी गलथान कारभारा ग्रामस्थांमध्ये कमाली नाराजी पसरली असुन या विषया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी या ग्रामस्थांच्या आरोग्याशी निगडीत या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.