यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव पिक सरंक्षण संस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद रामराव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सुशिला जनार्दन कोळी यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत चेअरमन व व्हा.चेअरमन यांना माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, किनगाव येथील प्रगतशील शेतकरी सुरेश जिवराम चौधरी, चंन्द्रकांत चौधरी, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील, किनगाव बुद्रूकच्या सरपंच निर्मला पाटील, संजय पाटील ,खुर्दचे सरपंच भुषण नंदन पाटील व्ही.मार्ट व विकासो संचालक मनिष विजयकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य बबलु जनार्दन कोळी, माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी, सामाजीक कार्येकर्ते डॉ.योगेश पालवे, विकासो चेअरमन विनोद देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत भगवान पाटील,समिर गुलशेर तडवी,संजय वराडे,प्रफुल्ल पाटील, डाँ.अनिल बोरसे,वसंत मराठे, अशोक रामदास मोरेसह रेशीमशेती गृप,किनगाव ग्रामस्थ व परीसरातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.
या निवडणूकी दरम्यान या निवडणूकीचे निर्णय आधिकारी म्हणून डी.जे.तडवी तर सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून संस्थेचे सचिव प्रकाश काशीनाथ पाटील यांनी कामकाज पाहीले.