यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव खुर्द येथील बांधण्यात येत असलेल्या व्यायामशाळेचे काम हे अत्यंत निकृष्ट प्रतिचे करण्यात येत आहे. या संदर्भात सदरील बांधकामाची निकृष्ट पातळीवर संपुर्ण चौकशी झाल्याशिवाय संबधीत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे .
या संदर्भात दिलेल्या तकार निवेदनात ग्रामस्थ सईद खाटीक यांनी म्हटले आहे की , किनगाव खुर्द तालुका यावल या गावात लाखो रुपयांच्या शासकीय निधीतुन व्यायाम शाळेचे बांधकाम गावातीलच एका ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. सदरचे काम शासकीय निविदा प्रमाणे होत नसल्याने अत्यंत सुमार व निकृष्ट प्रतीचे केले जात आहे. या कामाची चौकशी व्हावी अशी तक्रार केली असून शासकीय नियमावलीनुसार व्यायाम शाळेची इमारत बांधलेली नसल्याने भविष्यात ही इमारत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ही खाटीक यांनी प्रस्तृत प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले. या कामाच्या पाहणीस यावल पंचायत समितीचे बांधकाम अभियंता हे तक्रारीची दखल म्हणुन कामास पाहण्यास देखील आले नसल्याने बांधकाम अभियंता व ठेकेदार यांच्या संगनमताने या परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची ठेकेदार व बांधकाम अभियंता यांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ठ प्रतिची कामे करून गावपातळीवर विकासकामांचा देखावा करून सर्रासपणे शासकीय निधीची वाट लावली जात असल्याची अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार आहे. यावल पंचायत समितीकडे या विषयी लिखित तक्रारी देखील करण्यात आलेली आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर या प्रश्नाकंडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी या विषयात विशेष लक्ष घालुन यावल तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची चौकशी करावी अशी ही मागणी होत आहे.