यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील ११ वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तिने अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने पोलीसात त्या अज्ञात व्याक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, नुर मोहम्मद साबीर खान (वय ११) रा.गौशिया नगर, किनगाव ता, यावल या मुलास १७ जुन रोजी दुपारी ४,३oवाजेच्या सुमारास राहत्या घरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्तिने काहीतरी अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले. दरम्यान १५ जूनपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असुन, शाळेत जाण्यासाठी मुलांची वर्दळ असते. अशा वेळेस या मुलास अज्ञात व्यक्तिने पळवुन नेल्याची घटना घडल्यामुळे परिसरात विद्यार्थी पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेते विषयी एकच भिती व चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या घटने बाबत नुर मोहम्मद खान या मुलाची आई सईदाबी साबीर खान यांनी पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.