जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने दीपावलीच्या दिवशी आदिवासी गोरगरीब कुटुंबातील मुलांसाठी दिवाळीचे फराळ वाटप करण्यात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंनेतर्फे ज्या गावात कुपोषणाचा प्रश्न उद्भवला होता असा असाबारी तालुका यावल तसेच जानोरी तालुका रावेर येथील वस्त्यांमध्ये जाऊन फरसाण व मिठाई वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सविता अतुल भालेराव , संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमजान तडवी, यांनी सर्व उपस्थिती बंधु भगीनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.
विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर, जिल्हाध्यक्ष महासंघ सुनील सोनवणे, राज्य सहसचिव आर. एस. अडकमोल, महासंघ सचिव सुभाष लोखंडे, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना प्रताप बोदडे, विभागीय उपाध्यक्ष जितेंद्र जावळे, सय्यद शफीक सिद्दीकी अली, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उर्दू विभाग जळगाव, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद हनीफ कुरबान अली, सामाजिक कार्यकर्ते गंभीर तडवी, उपसरपंच गफूर तडवी, जानोरी इसुफ तडवी, जेष्ठ सल्लागार रमेश सोनवणे, विभागीय उपाध्यक्ष रविंद्र पालवे, शिवाजी शिरोळे, उपस्थित होते. प्रास्तविक जिल्हाध्यक्ष प्रताप बोदडे यांनी केले व्यक्त केले, या प्रसंगी अनिल सुरडकर यांनी कास्ट्राईब संघटनेबाबत माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, दिवाळीच्या दिवशी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी वस्तीमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद व्यक्त केला.