Home Cities एरंडोल कासोद्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात

कासोद्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात


kasoda news

कासोदा, प्रतिनिधी | येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ रविवारी (दि.१९) सकाळी ८.०० वाजता माजी जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 

त्याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.निशाद शेख, आरोग्य सेविका शोभा पाटील व कर्मचारी आणि लहान बालकांच्या माता उपस्थित होत्या.

त्याप्रसंगी आलेल्या बालकांना उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते पल्स पोलिओ डोस देण्यात आला. संपूर्ण गावात व तालुक्यात आज ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. बहुतांश ठिकाणी गावात वार्डा-वार्डात आशा सेविकांनी ही मोहीम यशस्वीरित्या राबवली.


Protected Content

Play sound