कासोदा, प्रतिनिधी । येथील मालवाहू चालक-मालक व जय भोले ग्रुप यांच्यातर्फे महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आली.
कासोदा येथील भडगाव एरंडोल लगतच्या महेश मंदिरात मालवाहू ४०७ गाडी , पिकअप , आदी मालवाहू गाडी चालक – मालक यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व ग्रामस्थानां व रस्त्याने जाणार येणार सर्व भाविकांना फराळाचे वाटप केले. या कार्यक्रमात सर्व मालवाहतूक करणारे ४०७ गाडी , पिकअप व सर्व चालक मालक व जय भोले गृप यांनी हिरीरीने सहभाग घेतला.