जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कासमवाडी रिक्षा स्टॉपजवळून व्यापाऱ्याची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनुप शामलाल अग्रवाल (वय-४५) रा. विश्राम नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. कासमवाडी येथील रिक्षास्टॉप जवळ कामाच्या निमित्ताने अनुप अग्रवाल हे दुचाकी (एमएच १९ सीएस ३९४९) ने ३० जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी रिक्षा स्टॉपजवळ पार्किंगला लावेलेली होती. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचकी कुठेही आढळून आली नाही. अखेर एक महिन्यानंतर त्यांनी शनिवारी २७ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिग पाटील करीत आहे.