गोवा (वृत्तसंस्था) काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात आणि गोल्फ खेळतात, असे वादग्रस्त वक्तव्य गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे.
बागपतमध्ये भाषण करताना सत्यपाल मलिक म्हटले की, राज्यपालांना काही विशेष काम नसतं. जम्मू काश्मीरमधील राज्यपाल तर दारु पितात आणि गोल्फ खेळण्यात व्यस्त असतात. इतर ठिकाणीही राज्यपाल आरामात राहतात आणि कोणत्या वादात पडत नाहीत. काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पितात आणि गोल्फ खेळतात असेही त्यांनी म्हटले आहे. मलिक यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते.