जळगाव, प्रतिनिधी । गदिमांचे स्मारक व्हावे यासाठी राज्यभर जागर करण्यात येणार होते, परंतु, पुणेच्या महापौरांनी स्मारक होणार असल्याचे जाहीर केल्याने आज काव्य रत्नावली चौकात गदिमांच्या काव्याचे वाचन करण्यात आले.
आज गदिमांचे स्मृतिदिनी शासनाने घोषीत केलेलं स्मारक पूर्णत्वास जाण्यासाठी काव्य रत्नावली चौकात काव्य जागर करून आंदोलन करण्यात येणार होते, परंतु, पुण्याच्या महापौरांनी १५ दिवसाच्या आत स्मारकाचे भूमिपूजन करू अशी घोषणा केल्याने आंदोलन न करता गदिमांच्या स्मृती दिनानिमित्ताने काव्य रत्नावली चौकात प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून गदिमांच्या काव्याचे वाचन करण्यात येत आहे. याप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, गिरीश कुलकर्णी, शशीकांत हिंगोणेकर, अशोक कोतवाल, साहेबराव पाटील, विनोद ढगे आदी उपस्थित होते. शंभू पाटील यांनी लाइव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले की, जिल्ह्यातील बहिणाबाई, साने गुरुजी व बालकवी या तिघांच्याकवींच्या स्मारकाची घोषणा होऊन १० वर्षाचा कालवधी लोटला तरी बहिणाबाई व बालकवी यांच्या स्मारकास निधी आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने माडगूळकर यांचे स्मारक जाहीर केलेले असले तरी सरकारच्या इच्छाशक्ती अभावी ते पूर्णत्वास गेले नसल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. गदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत यांनी दबाव गट तयार करून सरकारला या गोष्टी करायला भाग पाडले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आशा फाउंडेशनचे संचालक गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, महामोह्पाध्य दत्तू वामन पोतदार यांनी ज्यांचा आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरव केला व स्वातंत्र्य वीर सावरकर यांनी त्यांच्या काळातील त्यांच्या पिढीतील असा कवी होणे नाही असे गौरोद्गर माडगूळकर यांचायाबाबत काढले होते याची आठवण करून दिली. गदिमा अतिशय कल्पक, संवेदनशील कवी होते, त्यांची इतरांना प्रेरणा मिळावी त्या अनुषंगाने स्मारक होणे अतिशय गरजेचे असून यासाठी सर्व साहित्यिकांच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याने ते लवकरच पूर्णत्वास जाईल असा आशावाद श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
https://www.facebook.com/508992935887325/videos/868598030577874