कार्यालयीन वेळा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

 

मुंबई / नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्रासह पाच राज्यांतील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईतील उपनगरीय रेल्वे, रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणली.

 

सकाळी १० ते संध्याकाळी ५ ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेची पारंपरिक मानसिकता बदण्याची आवश्यकता असून वेगवेगळ्या वेळांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी  मागणी मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली. निती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. मुंबईत केंद्र सरकारची कार्यालये, बँका यांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी  निर्बंध शिथिलझाल्यापासून करण्यात येत आहे.

 

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. ती टाळण्यासाठी केंद्राने कार्यालयांच्या वेळा बदलण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.

 

महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत दैनंदिन वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. केवळ महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमधील एकूण रुग्णांपैकी सक्रिय रुग्णांचे प्रमाण ७५.८७ टक्के आहे

 

सरकारी कार्यालयांमुळे सकाळी आणि सायंकाळी उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होते. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे आणि गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलणे गरजेचे आहे. केंद्राने कार्यालयांच्या वेळा बदलल्यास उपनगरी गाड्यांची गर्दी विभागली जाईल.

Protected Content