कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केल्याच्या हिंदूत्वावादी संघाटनांतर्फे निषेध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले आपारापेठ या गावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्या केल्याच्या निषेधार्थ  जळगाव तालुका विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बुधवारी २१ जून रोजी दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदन देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेले आपारापेठ येथे काही गुंडांनी बेसावध असलेल्या पाच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकाचे मृत्यू झाला असून अन्य ४ जण गंभीर जखमी आहेत. त्याचबरोबर परभण मध्ये देखील एका शिकलकरी समाजातील तरुणांवर गुंडांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. वारंवार हिंदू समाजावर हल्ले करण्याचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असल्याचे म्हणत. या घटनेच्या निषेधाचे निवेदन सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना देऊन या संदर्भात त्वरित कारवाई करून संबंधित गुंडांना अटक करावी, महाराष्ट्रातील कत्तलखाने बंद करावे, व जिहादी मानसिकतेला त्वरित पाय बंद घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, ॲड. श्रीराम बारी, मनोज बाविस्कर, बजरंग दलाचे महानगर संयोजक समाधान पाटील, हर्षल कोल्हे, विशाल जगदाळे, रवि कासार, स्वामी पोतदार, जगदीश पाटील, हर्षल पुरोहित, मंगेश काजवे, विशाल बारी, दिपक राजपूत, पवन शिंपी, विकी सोनवण यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content