धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कार्यकर्ते व शिवसैनिक हे माझ्यासाठी परिवारातील सदस्य असून माझे उर्जास्रोत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा होत असलेल्या ५ जून रोजी अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने धरणगाव येथे शिवसेना – युवासेनेची तालुका बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
युवासेना शाखेचे ५७ शाखा प्रमुख व उप शाखा प्रमुख नियुक्तीची घोषणा
ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धरणगाव तालुक्यातील युवासेना तर्फे ५७ युवासेना शाखेचे उदघाटन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी युवासेना शाखेचे ५७ शाखा प्रमुख व ५७ उप शाखा प्रमुखांची निवड करण्यात आली. त्यांना शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले. आपण लोकांच्या सुख दुःखात कायम हजर राहतो त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून मतदारसंघात 5 कोटी रुपये पर्यंत रुग्णांना मदत केली असून पुढेही अशीच मदत कार्य सुरु राहणार असल्याचे सांगितले,
याप्रसंगी तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, संजय पाटील सर व सर्वच मान्यवरांनी यांनी आवहान केले की,सर्वांचे लाडके नेतृत्व गुलाबभाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करून ऐतिहासिक सोहळा करण्याचे आवाहन करून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी ५७ शाखा स्थापन करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, पी. एम. पाटील सर, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, बाजार समितीचे संचालक गजाननबापू पाटील, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, युवसेना उपजिल्हा संघटक भैय्या मराठे सर, युवसेनेचे आबा माळी, चेतन पाटील, भैय्या माळी, दीपक भदाणे, पप्पू भावे, विलास महाजन, वासुदेव चौधरी, विनायक माळी, विजय महाजन, संतोष महाजन, डी. ओ. पाटील, पवन पाटील, निंबा कंखरे, रवींद्र कंखरे. दीपक पाटील, चंदू शेठ भाटिया, संजू चौधरी, सर्व नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात रवींद्र कंखरे यांनी धरणगाव तालुक्यातील संघटना बांधणी, झालेली विकास कामे व बुथरचना बाबत विस्तृत माहिती विषद केली. तसेच सूत्रसंचालन युवासेना उपजिल्हा संघटक भैया मराठे यांनी केले. आभार युवसेनेचे विधासभा क्षेत्र प्रमुख आबा माळी यांनी मानले.