जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेला कारण नसतांना मारहाण व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ३ जूलै रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात माहेर आलेल्या प्रियंका अविनाश बाविस्कर (वय-२३) यांचा विवाह अमळनेर शहरातील अविनाश शांताराम बाविस्कर यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती अविनाश बाविस्कर याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लहान लहान गोष्टींवरून वाद घालून विवाहितेला मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. शिवाय सासू, सासरे आणि नणंद यांनी देखील शारिरीक व मानसिक त्रास दिला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर विवाहितेने सोमवारी ३ जुलै रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती अविनाश शांताराम बाविस्कर, सासरे शांताराम राजधर बाविस्कर, सासू निर्मला शांताराम बाविस्कर आणि नणंद गौरी भूषण वानखेडे सर्व रा. अमळनेर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.