कारण नसतांना तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको परिसरात काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष कडू तायडे (वय-३२) रा. शिवाजी नगर, हुडको, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १९ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास संतोष तायडे हा त्याचा मित्री किरण रमेश पाटील रा. शिवाजी नगर हुडको हे सुर्यमुखी हनुमान मंदीराजवळ उभा असतांना त्याच परिसरात राहणारा गोपी उर्फ गोपीमामा धोबी याने काहीही कारण नसतांना संतोषला लोखंडी वस्तून बेदम मारहाण करून हाताला दुखापत केली तर किरण पाटील याला शिवीगाळ करून धमकी दिली. या घटनेनंतर संतोष तायडे याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गोपी धोबी याच्या विरोधात सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content