मुंबई प्रतिनिधी | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलाने सीबीआयच्या पोलीस उपनिरिक्षकाला एक आयफोनच्या बदल्यात त्यांच्याकडून अहवाल लीक करून मिळवल्याची माहिती समोर आला आहे.
याबाबत वृत्त असे की, अनिल देशमुख हे सध्या गोत्यात आले असून त्यांचे वकील आनंद डागा यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. मुंबईतील बार आणि हॉटेलांकडून हप्तेवसुलीच्या आरोपप्रकरणी तपासाचा एक अहवाल फोडल्याच्या संशयावरून सीबीआयने देशमुख यांचे वकील आणि सीबीआयचेच पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्याविरोधात बुधवारी गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर तपासाअंतर्गत अनिल देशमुख यांचा तपास अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारीला आयफोन १२ प्रो लाच म्हणून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे आयफोनचे अद्ययावत मॉडेल असून याच्याच बदल्यात तिवारी याने अहवालाची पीडीएफ कॉपी डागा यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
सीबीआयमधील लाचखोरी ही नवीन बाब नाही. मात्र आता आयफोनच्या बदल्यात एखाद्या महत्वाच्या विषयावरील अहवाल लीक करण्याची बाब ही अतिशय गंभीर असून याचमुळे देशमुखांचे वकील डागा आणि सीबीआयचा उपनिरिक्षक तिवारी याला कोठडीची हवा खावी लागली आहे.