कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असावा

 

भुसावळ, प्रतिनिधी । जळगाव शहरासह भुसावळ या शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न , रस्तालूट, घरफोडी, जबरीचोरी, चैन स्नचिंग,बलात्कार करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांवर पोलीस प्रशासनाने मेहर नजर ठेवून अशा सक्रिय सराईत गुन्हेगारांना आता दत्तक घेण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

एका सराईत गुन्हेगाराची जबाबदारी एका पोलिस कॉन्स्टेबलने घेवून, त्याने पंधरा दिवसातून एकदा आरोपीच्या घरी भेट द्यावी आणि गुन्हेगाराने पंधरा दिवसातून एकदा पोलिस ठाण्यात भेट द्यावी. यामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवता येेईल. तसेच बंदूक ,चाकू, तलवार, गुप्ती यांसारखे प्राणघातक शस्त्र वापरून वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर आता हद्दपारीची कारवाई करणार यावी. प्रसंगी त्यांच्यावर “एमपीडिए”ची सुद्धा कारवाई करण्यात करण्यात यावी. तसेच नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी. भुसावळ शहरात एकाच परिवारातील पाच जणांचे खून करण्यात आल्याची घटना सर्वश्रृत आहे.

शहरातील गुन्हेगारी डोकेवर काढीत आहे. ही गुन्हेगारी संपविण्यात यावी. मटका, सट्टा, जुगार, गुटखा, अवैध दारूचे गांजाचे धंदे बंद करण्यात यावे अशी चर्चा जळगाव शहरासह भुसावळ परिसरातील नागरिकांत रंगत आहे. यापुर्वी भुसावळ शहरात निलोत्पल नावाचे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी आले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपली जबाबदारी चोखपणे इमानदारीने पार पाडली होती. भल्याभल्या गुंडांची गुंडगिरी मोडी काढली होती. गुन्हेगार शहर सोडून फरार झाले होते. वर्षभर मटका सट्टा दारूचे अवैद्य धंदे बंद होते. महिलांची छेडखानी कोणी करत नव्हते. काळा धंदेवाल्यांशी मिलीभगत करून हप्ते खाणारे राजकारणी पुढारी त्यांनी वठणीवर आणले होते. गुंडांवर दहशत निर्माण करून त्यांनी कायदा व्यवस्था अबाधित राखली होती. त्यानंतर त्यांच्याजागी गजानन तुळशीराम राठोड उपविभागीय अधिकारी आले त्यांच्या कारकिर्दीत पुन्हा जैसे थे वातावरण झाले आणि गुन्हेगारी वाढली. उपविभागीय अधिकारी गजानन तुळशीराम राठोड यांची मुंबई येथे बदली झालेली असून त्यांच्या जागी सहाय्यक आयुक्तपदी निलोत्पलसाहेबासारखाच कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी यायला हवा अशी आग्रहाची मागणी जळगावसह भुसावळ शहरातील महिला पुरूष नागरिक करित आहेत.

Protected Content