पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील मोंढाळे येथे एका शेतकऱ्याचा कापूस मोजतांना शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पारोळा पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यासह मापाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, व्यापारी लहू धुडकू पाटील रा. मोंढाळे प्र.उ. ता. पारोळा व संजय दशरथ वाणी रा. डी.डी. नगर पारोळा यांना शेतकरी विलास पाटील यांनी इतर शेतकरी प्रमाणे 5 हजार 200 रुपये क्विंटल प्रमाणे आपला कापूस दिला होता. त्याचे मापडी रावण त्र्यंबक पाटील रा. दळवेल ता पारोळा हा मोजमाप करीत होता. मापडी मोजमाप करीत असताना कापूस चवळ्याला गुडघे लावीत असल्याचे त्यांचे लक्षात आले. 22 वा तोल मजल्यावर तो परत मोजण्याचा आग्रह शेतकरी पाटील यांनी केला असता. सुरवातीला मापडीने नकार दिला. उपस्थित इतर शेतकऱ्यांनी तोच तोल परत मोजण्याचा भाग पाडले असता तो तोल 40 किलो ऐवजी 42 किलो भरला. म्हणजे प्रति क्विंटल 5 किलो म्हणजे 260 रुपये किंमतीचा कापूस व्यापारी हे जास्त घेत आसल्याचे स्पष्ट झाल्याने एकच गोंधळ उडाला. उपस्थित शेतकरी संतप्त होऊन व्यापारी, मापडी यांना चोप दिला.
यापूर्वी याच व्यापाऱ्यांनी इतर शेतकऱ्यांची कापूस मोजला असल्याने ते शेतकरी या ठिकाणी धडकून व्यापाऱ्यांना जाब विचारू लागले. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलीस ही त्या ठिकाणी दाखल झाले. शेतकरी विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघी व्यापारी व मापडी विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.