जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।
जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे कौटुंबिक वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ जण जखमी झाले असून याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथे मुलगा आणि मुलगीने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून दोन गटात तूफान हारामारी झाली. यामध्ये अश्लील शिवीगाळ करत एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. या हाणामारीमध्ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी यशोदाबाई विजय राठोड (वय-४२, रा.कापूसवाडी ता.जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पंडित धीरसिंग राठोड, आदित्य धनसिंग राठोड, विजय धनसिंग राठोड, धनसिंग देवसिंग राठोड, कतार पंडित राठोड, किरण पंडित राठोड आणि ज्ञानेश्वर विजय राठोड सर्व रा. कापूसवाडी ता. जामनेर यांच्या विरोधात शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन सोनवणे करीत आहे.



