जळगाव, प्रतिनिधी । वाढती महागाई व कापूस उत्पन्नाचा खर्च पाहता कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने जिल्हाधिकारी यांना आज सोमवार १६ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
रब्बी हंगामात पाऊस उशिरापर्यत झाल्यामुळे प्रती एकराप्रमाणे जो उतारा बसत होता तो यावेळेला मिळालेले नाही. सतत दरवर्षी येणाऱया अडचणी २०१७ मध्ये बोड आळी तर २०१८ साली दुष्काळ पडल्याने त्या त्या वेळी पुरेसे उत्पन्न होऊ शकले नव्हते. मागील ४ वर्षांपासून शेकऱ्यांच्या मागे दुष्टचक्र लागले असून ते कुटुंबांच्या प्राथमिक गरजा देखील पूर्ण करू शकत नसल्याने शेतकऱ्यांना कपाशी पिकासाठी प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. मागील ५ वर्षात कपाशीच्या भावात खूप मोठी वाढ झालेली नसतांना मात्र, शेतीकामासाठी लागणारी यंत्रसामुग्री, खते, मजूर यांच्यामसध्ये भरमसाट वाढ झालेली नाही. तरी कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना तालुका अध्यक्ष अविनाश पाटील, विभाग अध्यक्ष संदिप मांडोळे , इमाम पिंजारी, अमीन तडवी, हर्षल वाणी, राजेंद्र निकम, नागराज आमले आदीं उपस्थित होते.