कागदोपत्री टाकीसाठी वेगळी जागा अन् बांधली दुसऱ्याच जागेवर (व्हिडीओ)

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील कळमोदा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाच्या जागेच्या ऐवजी दुसऱ्याच्या जागेवर अतिक्रमण करून पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जागा खाली करून देण्याची मागणी जागा मालकाने केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील कळमोदा येथील ग्रामपंचायतीने दहा ते बारा वर्षांपुर्वी ठराव करून गावातील गट नंबर ४०५ मध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतू कागदोपत्री आलेल्या जमीन गट नंबर ४०५ मध्ये न बांधता ती गावातील रहिवाशी रविंद्र बोंडे यांच्या मालकीच्या जमीन गट नंबर ४०६ मध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आली. दरम्यान रविंद्र बोंडे यांचे आईवडी अशिक्षित असल्याने हा प्रकार लक्षात आला नाही.त्यानंतर रविंद्र बोंडे यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या मालकीची जागा जमीन गट नंबर ४०६ मध्ये ही टाकी बेकायदेशीर  व ठराव नसतांना बांधण्यात आली आहे.

 

त्यानुसार रविंद्र बोंडे यांनी ग्रामपंचायतीत तक्रार दाखल करण्यात आली असून सदरील जागा खाली करून ताब्यात देवून आतापर्यंतचे भाडे देखील देण्यात यावे अशी मागणी केली आहे. तर ग्रामसेवक धांडे यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की,  ठरावानुसार जागा ही जमीन गट नंबर ४०५ मध्ये दाखविण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात टाकी ही जमीन गट नंबर ४०६ मध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेवून योग्य तो पर्याय काढण्यात येईल असे सांगितले.

Protected Content