शेंदूर्णी प्रतिनिधी | येथे शहरातील भक्तगण व वारकरी संप्रदायाचे वतीने आयोजित भगवान श्री. त्रिविक्रम मंदिरात काकडा आरती मासाची समाप्ती करण्यात आली.
दि. १९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी ५.३९ ते सकाळी ६.०० वाजे पर्यंत काकडा स्नान भजन व काकड आरती केली जात होती. या काकडा आरतीसाठी सर्व वारकरी व ह.भ.प. काशिनाथ बुवा बारी, सखाराम बुवा बारी कन्हैया महाराज, रामेश्वर महाराज किसन बाबा, नारायण महाराज हिवाळे, संजय महाराज, कडुबा महाराज माळी, अजय जहागीरदार, देवराम चौधरी, महिला प्रभात फेरी वाले उपस्थित राहत होते. काकडा स्नान, पूजा, आरती, मंदिराचे पुजारी भूषण भोपे करत होते. महाराज मंडळी दररोज उपस्थित राहत होती. या काकडा आरतीचा समारोप शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी प्रसादरूपी अन्नदान करण्यात आले.