Home क्राईम कांडवेल येथे विषारी औषध घेऊन शेतक-याची आत्महत्या!

कांडवेल येथे विषारी औषध घेऊन शेतक-याची आत्महत्या!


रावेर,प्रतिनिधी| अतिवृष्टीमुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाल्याने आलेल्या नैराशातून शेतकऱ्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कांडवेल येथे उघडकीला आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कांडवेल येथील निवृत्ती नारायण पाटील (वय ४५) यांनी आपल्या शेतातील तीन एकरात कपाशीची लागवड केली होती. परंतु अतिवृष्टीमुळे शेतातील पिक जमीनदोस्त झाले. यंदाचा हंगामाच वाया गेल्याने पाटील कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. यातून आलेल्या नैराशातून त्यांनी शेतात जाऊन कपाशीवरील फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पाश्च्यात लहान दोन मुले आहे.

 


Protected Content

Play sound