जळगाव प्रतिनिधी । शिवणकाम शिकवणीसाठी गेलेली कांचन नगरातील २० वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली आहे. मुलीच्या आईच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, कांचन नगरातील विलास चौकात राहणारे रमेश मेवाने यांची मुलगी मुस्कान उर्फ राणी रमेश मेवाणे (वय-२०) हीने गेल्या एक ते दीड महिन्यापासून गेंदालाल मिल परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये शिवणकाम व ब्यूटी पार्लरचे क्लास लावले आहे. दररोज दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत क्लासला जात होता. नेहमीप्रमाणे ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता क्लास गेली. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तिला घेण्यासाठी तिची आई बिंदूबाई मेवाने ह्या घेण्यासाठी गेल्या. मात्र मुलगी क्लासला नसल्याचे सांगण्यात आले. आई व भावाने तिच्या मैत्रिणीकडे संपर्क करून मुस्कानचा शोध घेतला. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी न आल्याने आज सकाळी शनीपेठ पोलीस ठाणे गाठले. आई बिंदूबाई मेवाने यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास योगेश माळी करीत आहे.