Home क्राईम कांचन नगरातील विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता; शनिपेठ पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद

कांचन नगरातील विवाहिता दोन दिवसांपासून बेपत्ता; शनिपेठ पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद

0
41

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी । शहरातील कालिका माता मंदिरा परिसरातील कांचन नगरातून २८ वर्षीय विवाहित घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, हर्षाली दीपक पाटील (वय-२७) रा. कालिका माता मंदिरजवळ कांचन नगर ह्या विवाहिता पती दीपक खुशाल पाटील यांच्यासह वास्तव्याला आहे. दीपक पाटील हे खासगी कंपनीत मजुरीला असून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान गुरुवार १७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता विवाहिता हर्षाली पाटील या घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहेत. त्यांचा इतरत्र शोध घेऊनही त्या घरी न परतल्याने त्यांचे पती दीपक खुशाल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून शुक्रवार १८ मार्च रोजी सायंकाळी शनिपेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.


Protected Content

Play sound