मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधार्यांना जोरदार लक्ष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना शिंदे सरकारवर जोरदार टिका केली. ते म्हणाले की, त्यांनीच भांग पाजली का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले? भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत, त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी टिका केली.

दरम्यान, संजय राऊतांनी ट्वीटही केलं आहे. या ट्वीटसोबत राऊतांनी फडणवीसांचा धुळवड खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे. बांधावर पिकं आडवी झाली. शेतकर्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात न्हाऊन निघालं. ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.



