जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ् शिक्षण आणि अध्यय विभागाच्या वतीने ५ जुलै पासून जर्मन आणि जापनीज् विदेशी भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचे ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर विविध ठिकाणी असलेल्या रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी या दोन विदेशी भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रमांना प्रारंभ होत आहे. कुलगुरु प्राा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून या दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईन असणार आहेत. ऑनलाईन जपान भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रम (बेसिक लेव्हल एन५) आणि ऑनलाईन जर्मन भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रम (बेसिक लेव्हल ए१) असे या दोन्ही शिक्षणक्रमाचे नाव असून www.nmu.ac.in/ideal या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश लिंक उपलब्ध् करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सर्टिफिकेट प्रोग्राम लिंक वर क्लिक केल्यास अधिक माहिती मिळेल. याशिवाय ०२५७ -२२५७४९५/२२५८४९६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन या विभागाचे संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी केले आहे.