कवयित्री बहिणाबाई विद्यापीठात विविध कार्यक्रम

 

जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत ओपन हाऊसच्या रौप्य महोत्सवी वर्ष पूर्तीनिमित्त शुक्रवारी विविध स्पर्धा, रक्तदान शिबिर यांचे आयोजन करण्यात आले. काळ सत्रात ओपन हाऊसचे उदघाटन संपन्न झाले.

जळगाव येथील वास्तु आरोग्यमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आकांक्षा कुळकर्णी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी मिळते. त्यामुळे ओपन हाऊसमधील आयोजित विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा. सत्येंद्र मिश्र, संचालक प्रा. जे.बी.नाईक, प्रा.जी.ए.उस्मानी हे होते. प्रा.माहुलीकर यांनी ओपन हाऊसच्या 25 वर्षपूर्ती बाबत शुभेच्छा देत ओपन हाऊस आणि विज्ञान व तंत्रानाबददलचे महत्व सांगितले. सूत्र संचालन प्रा. उस्मानी यांनी तर आभार डॉ.एम.आय.तालिब यांनी मानले.

यानंतर रक्तदान शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींनी या शिबीरास भेट दिली. या शिबीरात 47 विद्यार्थी व शिक्षकांनी रक्तदान केले. नंतरच्या सत्रात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत पोस्टर प्रेझेंटेशन आणि विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रा.माहुलीकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आले. यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये पहिले पारितोषिक कृतिका सायनेकरसह इतर विद्यार्थी, दुसरे पारितोषिक वरद नारकर सह इतर विद्यार्थी हे मानकरी ठरले. तर प्रकल्प सादरीकरणात प्रथम पारितोषिक लविश पाटीलसह इतर विद्यार्थी आणि दुसरे पारितोषिक राहुल पाटीलसह इतर विद्यार्थी यांना मिळाले.

यानंतर, छायाचित्रे व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पहिले पारितोषिक दिशा शर्मा तर दुसरे पारितोषिक सुकन्या पाटील या विद्यार्थीनींनी पटकाविले. दुपारसत्रात श्रीमती आकांक्षा कुळकर्णी यांचे विज्ञानातील महिला याविषयावर व्याख्यान झाले. ओपन हाउस कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्याथ्र्यांनी प्रयत्न केले.

Protected Content