कळमोदा येथे काकडा आरतीसह दिंडी सोहळा उत्साहात

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । यावल तालुक्यातील कळमोदा येथे महिनाभरापासून सुरू असलेला काकडा आरतीसह दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

 

गेल्या १९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या काकडा आरतीची १९ नोव्हेंबर रोजी समाप्ती करण्यात आली. यात दररोज सकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान पुरूष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, ग्रामस्थ व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान गावातून दिंडी सोहळा करण्यात आला. त्यानंतर दुपारी गावातील अन्नदाता यांच्या माध्यमातून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला तर रात्री विठ्ठल मंदीरात हभप योगेश महाराज चिंचोलकर यांचे किर्तन झाले. यावेळी या किर्तनाला पंचकोशीतील भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ व भाविक उपस्थित होते. त्याप्रमाणे दररोज काकडा आरतीला भास्कर बोंडे, हेमराज बोंडे, निवृत्ती जावळे, नितीन सपकाळे, जगन्नाथ बोंडे, मुकेश पाटील, गोपाळ बोंडे, राहुल पाटील, भागवत पाटील, अंबादास पाटील, किरण पाटील व महिला भजनी मंडळ, आणि सर्व गावातील भाविक उपस्थित होते.

दिगंबर महाराज वारकरी शिक्षण संस्था रावेर यावलचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची ‘खानदेश सन्मान-२०२१’या पुरस्कारासाठी नुकतीच निवड करण्यात आलेली आहे त्यानिमित्ताने विठ्ठल मंदिर कळमोदा यांच्या मार्फत हभप निवृती जावळे यांनी शाल व श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला.

Protected Content