अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावाजवळ असलेल्या पाडाळसे येथून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६४ हजार ९८० रुपये किंमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुरुवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाच्या तापी प्रोजेक्टचा निम्न तापी प्रकल्प अंतर्गत मेकॅनिकल गेटचे कामासाठी लागणारे लोखंडी प्लेटा अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे ठेवण्यात आले होते. २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६४ हजार ९८० रुपये किमतीच्या १५ टन वजनाच्या २८७ लोखंडी प्लेटा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे करीत आहे .