कळमसरेत उद्या मरीआईचा यात्रोत्सव

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील,कळमसरे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सवाचे उद्या मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

 

कळमसरे येथे गेल्या पाच वर्षापासून मरिआईचा यात्रेस प्रारंभ झाला.येथील हेमंत उखा व्हलर या नवख्या भक्ताने स्वयंपूर्तीने तसेच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने हि यात्रा भरावयास सुरुवात केली. .गावात तशा ग्रामदेवता भवानी आई तसेच मरीआई अशा दोन यात्रा भरतात. .मरीआईची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी भरवली जाते. यादिवशी बँड पथक सहवाद्य मोठी मिरवणूक निघते. या मिरवणुकीत गावातील महिला अबाल वृद्ध स्वयंपूर्तीने सहभागी होत असतात. यावर्षीही भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोना महामारीचे सावट असल्याने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन देखील केले आहे. दरम्यान गावातील व परीसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी रतन भोई नगरदेवळेकर यांचा लोक नाट्य तमाशा मंडळचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणी दुकाने, संसारोपयोगी साहित्य दुकानदार यांनी दुकाने थाटावी असे आवाहन भगत हेमंत व्हलर ,हेमंत न्हावी यांनी केले आहे.

Protected Content