यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मर्यादित जळगाव द्वारा संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त युवती सभेतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देवयानी बडगुजर हिने प्रथम क्रमांक पटकवला.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, त्यांना त्यांच्यातील कलेची जाणीव व्हावी ह्या उद्देशाने ही रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. २४ विद्यार्थीनी स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेत अनुक्रमे देवयानी बडगुजर (एफवाय बी. कॉम.) प्रथम, दिपाली सुतार (अकरावी किमान कौशल्य ) व रिता पाटील (अकरावी कला )द्वितीय, रोहिणी अहेर (एसवाय बी. कॉम. ) तृतीय यांनी यश प्राप्त केले. तर गायत्री बडगुजर (बारावी कला) व कल्याणी महाजन (बारावी विज्ञान) यांना उत्तेजनार्थ बक्षीस घोषित करण्यात आले. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून उपप्राचार्य प्रा. एम .डी. खैरनार, प्रा. ए .पी. पाटील , संजय पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे आयोजन युवती सभा प्रमुख डॉ. सुधा खराटे व भूगोल विभागातील नरेन्द्र पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्ही .व्ही. पाटील, कैलास चौधरी, संजय कदम, छत्रसिंग वसावे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.