कलम ३७०, सीएएचा निर्णय मागे घेणार नाही : पंतप्रधान मोदी

pm modi 2

 

वाराणसी (वृत्तसंस्था) कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर महाकालच्या आशीर्वादाने निर्णय घेण्यास आपण सक्षम झालो. त्यामुळे कलम ३७० असो की सीएए हे निर्णय सरकार मागे घेणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले आहे. देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सरकार मागे हटणार नाही, अशीच भूमिका याआधी मांडलीय.

 

 

आधी कलम ७३० आणि त्यानंतर सीएएविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर कलम ३७० आणि सीएएवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कलम ३७० आणि सीसीए हे आवश्यक होते. सरकारवर प्रचंड दबाव असतानाही हे निर्णय घेण्यात आले. यामुळे हे निर्णय कायम राहतील, अशी ग्वाही मोदींनी वाराणसीतील जाहीर सभेत दिली. दरम्यान, मुंबई, दिल्लीसह देशभरात सीएएविरोधात मोर्चे आणि आंदोलनं सुरु असून अनेक राज्यांनी सीएए लागू करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे.

Protected Content