कर्नाटक सरकारविरोधात राज्यभर निदर्शनं ; शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) कर्नाटक सरकारविरोधात राज्यभर निदर्शनं ; शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचा निषेध बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या घटनेचे आज दिवसभर महाराष्ट्रात सर्वत्र पडसाद उमटले. यावेळी शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

औरंगाबाद, हिंगोली,जळगाव,धुळे नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. राज्यात कोल्हापूरसह सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, जालना, नांदेड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये शिवभक्त आक्रमक झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निषेध आंदोलने होत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने महाराष्ट्रातील संतप्त शिवभक्त कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. कुठं पुतळ्याचे दहन, तर कुठं कर्नाटक सरकारला प्रतीकात्मक बांगड्यांचा‌ हार घालण्यात आला. तर धुळे महानगर पालिकेच्या जुन्या इमारती समोर शिवसेनेने आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप यावेळी शिवसेनेने केला. दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला होता.

Protected Content