कर्नाटकात कॉंग्रेस सुसाट : भाजपला धक्का !

बंगळुरू-वृत्तसंस्था | कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसला असून या पक्षाचा दारूण पराभव झाला असून कॉंग्रेसने दणदणीत विजय संपादन करत सत्तेत पुनरागमन केले आहे.

 

कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. यंदा सत्ताधारी भाजपला कॉंग्रेसने मोठे आव्हान उभे केले असून जेडीएसने देखील आपला बालेकिल्ला सांभाळण्यासाठी मोठी ताकद लावल्याचे दिसून आले. कडाक्याच्या उन्हाळ्यात तिन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. भाजपकडून थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर कॉंग्रेसतर्फे राहूल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. निवडणुकीच्या प्रचारात बजरंगबलीचा मुद्दा गाजला. कॉंग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्‍वासन आपल्या संकल्पपत्रात दिल्याने मोदींनी जय बजरंगचा नारा बुलंद करत मतदारांना मते मागितली. तर शेवटच्या टप्प्यात द केरला स्टोरीचा मुद्दा देखील खूप गाजला.

 

दिनांक १० मे रोजी झालेल्या मतदानानंतरच्या बहुतां एक्झीट पोल्समध्ये भाजप व कॉंग्रेसमध्ये जोरदार चुरस होणार असल्याचे दर्शविण्यात आले होते. या विशेष करून कॉंग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता दिसून आली होती. आज सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी  विजयाचे दावे केले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी आठ वाजता सर्वच्या सर्व २२४ जागांवर मतमोजणी सुरू झाली.

 

एका तासाच्या आत प्राथमिक कल समोर आले. यात भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात मोठी चुरस असल्याचे चित्र तयार झाले. यानंतर मात्र भाजपने निर्णायक आघाडी घेतली असून ती आतापर्यंत कायम ठेवली आहे. यानुसार कॉंग्रेसने १२८ जागांवर आघाडी घेतली असून भाजप फक्त ६७ जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे. जेडीएसने २२ जागांवर आघाडी घेतली असली तरी त्यांचे किंगमेकर बनण्याचे स्वप्न भंग पावले आहे. तर अपक्ष व इतरांना ७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

Protected Content