यावल प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या नियमांच्या अंमलबजावणीच्या कर्तव्यात कसुर असलेल्या तालुक्यातील मनवेल येथील पोलीस पाटील यांची प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी निलंबित केले आहे.
तालुक्यातील मनवेल येथील पोलीस पाटील सुरेश राजधर भालेराव यांनी आपल्या नेमणुक असलेल्या गावाच्या कार्यक्षेत्रात फैजपूर येथील राहणाऱ्या प्रतिभा मोरे यांनी मनवेल येथे संचारबंदीकाळात तोंडाला मास्क न लावता बेकायदेशीररित्या ५० ते ७० जणांच्या उपस्थितील सभा घेतली. यासभेत पोलीस पाटील स्वत: उपस्थित होते. तसेच गावात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला न कळविणे.लॉकडाऊनचे आदेश असतांना नियमांचे उल्लंघन व कर्तव्यावर कसूर व एकनिष्ठ न राहता आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचे निष्पन्न झाल्याने मनवेल तालुका यावल येथील नेमणुकीस असलेले पोलीस पाटील सुरेश भालेराव यांना प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी तडकाफडकी निलंबित केले असून पोलीस पाटील यांच्या विरूद्ध यावल पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.



