भोपाळ : वृत्तसंस्था । भाजप नेत्या इमरती देवी यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसतोय. या व्हिडिओत इमरती देवी कमलनाथ यांच्या आई-बहिणीचा उद्धार करत साठी ‘आयटम’ शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.
नुकत्याच काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या कॅबिनेट मंत्री इमरती देवी यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर कमलनाथ यांचे टीकाकार थंड पडले आहेत.
काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणाऱ्या प्रमोद कृष्णन यांनी इमरती देवी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. ‘तो बंगाली माणूस आहे. मध्य प्रदेशात केवळ मुख्यमंत्री बनण्यासाठी आला. त्या व्यक्तीला बोलण्याची सभ्यता नाही, काय म्हणावं. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर तो ठार वेडा झालाय. वेडा बनून संपूर्ण मध्य प्रदेशात फिरतोय. तो बंगाली माणूस माझ्या प्रदेशातला व्यक्ती नाही. त्याची आई-बहिण आयटम असतील, कमलनाथ यांची… आपल्याला काय माहीत नाही’ असे उद्गार काढताना या व्हिडिओत इमरती देवी पाहायला मिळत आहेत.