Home Cities चाळीसगाव कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना (व्हिडीओ)

कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना (व्हिडीओ)


चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात तीन-चार वेळा वादळी वाऱ्यास मान्सून बरसल्याने चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावरील कन्नड घाटात काही ठिकाणी दरड कोसळ्याची घटना घडली आहे.

घाटाच्या डाव्या बाजूला डोंगर असल्याने डोंगरावरील मुरूम, दगड गोटे रस्त्यावर ढासळले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूकीत काही अडथळा निर्माण झाला होता. गेल्यावर्षी दरड कोसळल्याची घटना घडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी पुढे आली आहे. या घाटाजवळच गौताळा अभयारण्य आहे. घाट परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने ते बुजविण्यात यावे अशी अपेक्षा वाहनधारकांमध्ये होत आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1388671284673628/


Protected Content

Play sound