कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या उंटांची मुक्तता

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हतनूर जवळ कत्तलीच्या उद्देशाने एका वाहनात कोंबून भरत घेऊन चाललेल्या ११ उंटांची मुक्तता करण्यात आली आहे.

 

कत्तलीच्या उद्देशाने ट्रकमध्ये निर्दयतेने कोंबलेल्या १२ उंटांची सुटका करण्यात आली आहे. त्यात १ उंटाचा मृत्यू झाला आहे. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशीषकुमार अडसूळ यांनी गोपनीय माहितीवरून तालुक्यातील हतनूर येथे अचानक वाहनांची तपासणी केली. त्यात बुधवारी रात्री साडेअकराला सीजी ०४ एनएस २००५ या क्रमांकाचा ट्रक थांबवण्यात आला असता उंटांना निर्दयतेने कोंबल्याचे आढळले.

 

सुटका केलेल्या उंटाना जळगाव शहराजवळील बाफना गो-शाळेत ठेवण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मालेगाव येथेही दोनशेपेक्षा अधिक उंटांची पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर जळगावात समोर आलेल्या या घटनेमुळे उंटांच्या तस्करीचा विषय ऐरणीवर आला आहे.

Protected Content