भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथील जि. प. शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नुकताच सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यातील उपजत कलगुणांची त्यांनाच नव्याने ओळख होण्यासाठी आणि त्यांच्यात स्नेह, समर्पण व एकीची भावना वाढीस लागावी. शहरी भागापेक्षा कमी संधी ही ग्रामीण भागात उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी या संधीचं जास्तीत जास्त सोने करावं, यासाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत-सत्कार करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले आणि मुख्य कार्यक्रमास गणेशवदंनेने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन भडगाव पंचायत समितीच्या सभापती हेमलता पाटील यांनी केले.
कार्यक्रमात बजने दे धडक धडक, शंकरा रे शंकरा, झिंग झिंग झिंगाट, हूड हूड दबंग, फुगे घ्या फुगे, स्कूल चले हम, पर्यावरण वाचवा नाटक, मूक नाटक, दारूबंदी नाटक असे विविध गाणी व नाटीका विद्यार्थ्यांनी सादर करून त्यांच्या कलाविष्काराचे दर्शन उपस्थितांना घडविले, उपस्थित पाहुणे व पालक यांनीही बक्षिसाचा वर्षाव करून चिमुकल्यांना प्रोत्साहित केले.
तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश पाटील, केंद्र प्रमूख कोमलसिंग पाटील तसेच वार्ताहर नितीन सोनार, प्रशांत पाटील, प्रमोद पवार, भानुदास महाजन आणि संजय महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मालिनी पाटील यांनी तर आभार संभाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापक लता पाटील व शिक्षक मालिनी पाटील, मनीषा पाटील, संभाजी पाटील, विरेंद्र राजपूत, रंजना भांडारकर, दिपाली देशमुख आणि सरिता पाटील यांनी परिश्रम घेतले. शेवटी राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.